धनगर समाज सेवा महिला मंडळ यांच्यावतीने 'एक झाड-एक राखी' उपक्रम संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :धनगर समाज सेवा महिला मंडळ यांच्यातर्फे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून एक झाड- एक राखी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास महिलांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. निसर्गाच्या ऋणात राहून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आयोजित केलेल्या एक झाड- एक राखी या वृक्षसंवर्धन चळवळीत सहभागी झालेल्या सर्व महिलांना धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या वृक्षसंवर्धन चळवळीत नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन अध्यक्षा मिनाक्षी येडगे, नगरसेविका छायाताई मेटकरी, उपाध्यक्षा दिपाली सरगर, सचिव मिनाक्षी गडदे, महानंदा मासाळ, संस्कृती लवटे, प्रियांका रूपणर, आशा सलगर, अर्चना लवटे, नकुशा जानकर, सुनीता आलदर, अनिता जानकर, स्वधा लवटे, डॉ. मेघना देवकते आदी महिलांनी आपला सहभाग नोंदविला.
0 Comments