google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Breaking News

महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

 महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती 


मुंबई : महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील, गणेशोत्सव, नवरात्र आणि कदाचित दिवाळी हे सण निर्बंधांतच साजरे करावे लागणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले असून, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये भारतात संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे आणि त्यात सर्वाधिक बाधित लहान मुले होणार असल्याचा इशारा देशाच्या टास्क फोर्सने दिला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने मंदिरे आणि सार्वजनिक सण-समारंभांवर बंदी घातली आहे.


या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती सांगितली आहे. “सध्या लॉकडाऊनचा कुठलाच विषय नाही. मात्र ज्यादिवशी ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल, त्यादिवशी लॉकडाऊन किंवा निर्बंधात वाढ केली जाईल आणि कडक निर्बंध लावावे लागतील. यासंबंधीच्या सूचना आम्ही आधीच जाहीर केलेल्या अधिसूचनेत दिल्या आहेत. त्यामुळे, सणासुदीच्या काळात राज्यात कोणताही लॉकडाऊन लावला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, राज्यात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी मृत्युदर आटोक्यात असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी अद्यापही धोका टळलेला नाहीये. यातच संभाव्य तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीचा काळ पाहता आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती, त्यावर आरोग्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने स्पष्टता आली आहे.

Post a Comment

0 Comments