पतीचा विरह सहन न झाल्यामुळे १८ महिन्यांच्या चिमुकल्यासह शिक्षकेची आत्महत्या
कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका असलेल्या पत्नीने तिच्या 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बानेगाव इथे घडली आहे.शीतल राजाभाऊ जाधवर आणि शांभवी अशी मृत मायलेकींची नावं आहेत. राजाभाऊ आणि शीतल जाधवर हे दोघेही पती पत्नी पुणे येथे पेशाने शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या शिक्षिका पत्नीने आपल्या मुलीसह माहेरी येऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments