सांगोला साखर कारखान्याच्या जमीनीवर IIA च्या धर्तीवर राज्यातील पहिले मॉडेल उभारणार...प्रफुल्ल कदम
प्रफुल्ल कदम यांच्या नव्या प्रस्तावासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठककारखाना कवडीमोल किमतीने विकण्याचा डाव मागे पडणार
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला साखर कारखान्याच्या जमिनीवर IIA च्या धर्तीवर राज्यातील पहिले मॉडेल उभारण्याचा प्रस्ताव किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते आणि सांगोला साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी तयार केला असून लवकरच संबंधित बँका, उद्योग विभाग आणि बचाव समितीची बैठक मुख्यमंत्री समवेत होणार आहे
.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई यांनी महाराष्ट्रातील कर्जबाजारी झालेले 12 साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. तथापि सदर निविदा कर्ज देणाऱ्या बँका, शासन आणि जनता या सर्वांसाठी अत्यंत तोट्याची आहे.यासाठी प्रफुल्ल कदम यांनी बँकेची देणी व्याज, परतावा, जमिनीची किंमत ,प्लॅन्ट, मशनरी या सर्वांचा अभ्यास करून नवीन प्रस्ताव तयार केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी यासाठी साखर कारखान्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तज्ज्ञांकडून बनवून घेतला होता.
सांगोला कारखाना साखर कारखान्याची 70.80 हेक्टर जमीन मालकीची असून प्लॅन्ट व मशिनरीसह एकूण कर्ज 128 कोटी 61 लाख इतके आहे. कारखाना सुरू करण्यासाठी येणारा खर्च सर्वसाधारण 25 ते 30 कोटी रुपये इतका आहे.या सर्व आर्थिक गंभीर बाबी लक्षात घेऊन प्रफुल्ल कदम यांनी महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2013 सोबतच एकात्मिक औद्योगिक पार्कचा अभ्यास करून नवीन अत्यंत फायदेशीर प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांनाही फायदा होईल त्याचबरोबर साखर कारखाना व इतर विविध उद्योगही त्या ठिकाणी चालू होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प असून असून राज्य शासनाने या बाबतचा निर्णय घेतल्यास सांगोला तालुक्यासह परिसराचा कायापालट होणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यासाठी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले .सांगोला साखर कारखाना कवडीमोल किमतीने विकण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर तर प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो हाणून पाडू "....
रविंद्र कांबळे( निमंत्रित संचालक, सांगोला तालुका साखर कारखाना बचाव समिती)
0 Comments