लेडी सिंघम! राजश्री पाटील यांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी अड्डा केला उध्वस्त
मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने अचानक धाड टाकून हातभट्टी दारू काढण्याचे साहित्यसह २२०० लिटर गुळमिश्रित रसायन, एक लोखंडी बॅरेलसह १० प्लास्टिक बॅरेल असा सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई चिकमहूद अंतर्गत तळेवाडी ता . सांगोला येथे केली. दरम्यान पोलिसांना पाहताच हातभट्टी चालविणाऱ्या व्यक्तीने तेथून पळ काढला.
मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना गोपनिय माहितीच्या आधारे चिकमहूद अंतर्गत तळेवाडी गावाच्या हद्दीतील शिवारात सोमनाथ दशरथ जाधव हा बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती.
त्याआधारे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने सदर ठिकाणी शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक धाड टाकून ही कारवाई केली.या कारवाईत हातभट्टी दारू काढण्याचे साहित्य, एक लोखंडी बॅरेलसह १० प्लास्टिक बॅरेल जप्त केले तर गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट केले.याबाबत, पोलीस नाईक अभिजीत राजेंद्र साळुखे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सोमनाथ दशरथ जाधव रा.चिकमहूद -तळेवाडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक अभिजीत मोहळकर करीत आहे.
0 Comments