google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक ! सोलापूरात जात पंचायतने टाकले तब्बल तीन वर्षे वाळीत ; दोन लाखांची लाच मागणाऱ्या ४ पंचांना अटक

Breaking News

संतापजनक ! सोलापूरात जात पंचायतने टाकले तब्बल तीन वर्षे वाळीत ; दोन लाखांची लाच मागणाऱ्या ४ पंचांना अटक

 संतापजनक ! सोलापूरात जात पंचायतने टाकले तब्बल तीन वर्षे वाळीत ; दोन लाखांची लाच मागणाऱ्या ४ पंचांना अटक 


 सोलापुरात गोंधळी समाजातील शरणीदास भोसले यास तीन वर्षांपासून समाजातून वाळीत टाकले . आता त्याचे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाखांची मागणी केल्याप्रकरणी 4 पंचांना अटक करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली . मागील जुन्या काळातील चुकीच्या रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात , माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी , यासाठी शासनाने अनेक कायदे केले.परंतु याची खरंच अंमलबजावणी होते का .. ? हा प्रश्न अनेक वेळेस पडतो . अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली आहे . जातपंचायतीचे प्रकार सर्रास उत्तर प्रदेश , मध्यप्रदेशमध्ये पाहायला मिळतात .त्यासंदर्भात गुन्हे देखील दाखल होतात . परंतु सोलापुरात देखील गोंधळी समाजामध्ये असाच प्रकार घडला आहे . सांगली येथे राहणाऱ्या शरणीदास पांडुरंग भोसले याचे आपल्या पत्नीबरोबर मागील चार वर्षांपूर्वी घरगुती कारणावरून भांडणे झाली होती . हा वाद सोलापुरातील गोंधळी वस्तीतील गोंधळी समाज पंचांच्या पंचायतसमोर मांडण्यात आला . यावेळी पंचांनी योग्य तो न्याय न करता शरणीदास भोसले याच्यावर अन्याय केल्याची तक्रार भोसले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली . यासह हे प्रकरण मिटवतो आणि तुझ्या पत्नीस नांदावयास पाठवतो , आम्हाला दोन लाख रुपये दे अशी मागणी गोंधळी समाजाचे पंच राम धोडिंबा शिंदे - पाटील , अशोक शिंदे - पाटील , नाना शिंदे - पाटील , संतोष राम शिंदे , उत्तम शिदे यांनी केल्याची तक्रारही भोसले यांनी दिली आहे . या घटनेची हकीकत शरणीदास भोसले यांनी सांगितली .आरोपी हे गोंधळे समाज पंचकमीटीचे पंच असून , यातील नमुद आरोपींनी फिर्यादीचे काहीही न ऐकता फिर्यादीला व फिर्यादीचे मुलांना जातीचे बाहेर काढले . त्यामुळे फिर्यादी त्यांना आमच्यावर अन्याय का करता असे विचारले असता आरोपी अ.क्र .२ याने फिर्यादीस दोन लाख रुपये दे , तुझी पत्नी नांदायला पाठवतो असे म्हणून फिर्यादीस त्यांचे समाजामधून बहिष्कृत केले . त्यामुळे फिर्यादीची समाजात व राहते परिसरात मानहानी झाली आहे . यासंबंधी 4 आरोपींना अटक केले असून , त्यांना न्यायालयासमोर उभे केले असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली . या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहेत . एकीकडे लोक एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहेत . जगात अनेक ग्रहांचा शोध सुरू आहे तर सोलापूर शहरात मात्र आजही जातपंचायतीच्या त्रासामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . शासनाने वेळीच लक्ष घालून अशा चुकीच्या रूढी - परंपरांवर आळा घालणे गरजेचे आहे तरच सामाजिक विकास होणार आहे .

Post a Comment

0 Comments