सोलापूर जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्यांत लॉकडाऊन होण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमधील माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यांमधील काही ठरावीक गावांमध्येच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.10 पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱया गावांची यादी तयार करण्यात आली असून, पाच तालुक्यांमधील 50 गावांमध्ये कडक लॉकडाऊन केला जाणार आहे.तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱयांना पाठविला जाणार असून, आज त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच ग्रामीण भागामध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. शहरातील कोरोना आटोक्यात आला; परंतु ग्रामीण भागाची चिंता कायम आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे नाव देशभर पसरले असून, राज्याने निर्बंध कायम ठेवलेल्या जिल्ह्यांमध्येही सोलापूरचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पाच तालुक्यांमधील 50 गावांमध्ये कडक निर्बंध लागू करून तेथील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाईदेखील होणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत गावातील कोणालाही परगावी जाता येणार नाही, असा तो प्रस्ताव असणार आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी विविध मोहिमांच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला;परंतु काही बेशिस्तांमुळे ठरावीक गावांमधील कोरोना कमी झाला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तसा प्रस्ताव तयार केला आहे. आता त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्याची लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे.
0 Comments