सोलापूर ¡ दहापेक्षा अधिक रुग्ण गावात आढळल्यास संपूर्ण गावाची तपासणी होणार
ज्या गावात दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आढळतात त्या संपूर्ण अंमलबजावणी गावाची आरोग्य तपासणी करा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद अधिकारी शंभरकर यांनी करमाळा येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी संचारबंदी असलेल्या करमाळा तालुक्याचा दौरा केला असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची नावे पोर्टलवरून वगळा ,
अशी सूचना त्यांनी केली असून करमाळा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या हस्ते ६० सिलिंडर क्षमतेच्या ऑक्सिजन प्लान्टचे उद्घाटन झाले.करमाळा येथे शंभरकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाची माहिती घेतली. निबंध पाळणान्यांवर कारवाई करा , अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.तसेच आरटीपीसीआर टेस्ट वाढवून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांची नोंद रोजच्या रोज पोर्टल करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. जे रुग्ण उपचार घेऊन घरी परततात, त्यांची नावे तत्काळ पोर्टलवरून वगळण्याची सूचना त्यांनी केली आहे.
अन्यथा कारवाई अधिक माहिती देताना शंभरकर यांनी सांगितले , ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत असल्याने पाच तालुक्यांमध्ये संचारबंदी केली आहे.संचारबंदीची अंमलबजावणी होत आहे का , याची तपासणी करण्यासाठी मागच्या आठवड्यात माढा आणि माळशिरस तालुक्यांचा दौरा केला.शुक्रवारी करमाळ्याचा दौरा केला. आरोग्य अधिकारी , पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत . प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोना आटोक्यात येईल . विनाकारण कोणीही बाहेर पडू नये . अन्यथा , कारवाई होणार आहे.
0 Comments