google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 5 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिल्या सूचना

Breaking News

5 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिल्या सूचना

 5 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिल्या सूचना


कोरोनामुळे शाळा सुरु करण्यावर मर्यादा येत असल्याने शिक्षकांचे केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे . शिक्षक दिन म्हणजेच ५ सप्टेंबर आधी शिक्षकांचे लसीकरण करावे अशा सूचना  राज्यांना दिल्या आहेत . केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्विट करून  राज्यांना सूचना केल्या आहेत.केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटमध्ये  म्हटले आहे .


 यापुढे प्रत्येक राज्याला लस उपलका करून दिल्या जाणाऱ्या लशीमध्ये दोन कोटी डोसची संख्या वाढविली जाईल . त्यामुळे राज्याने ५ सप्टेंबर आधी सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे . महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा बंद आहेत.मध्यंतरी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याचे आदेश काढले होते . मात्र , कोरोना संसर्गाचा धोका असल्याने शाळा सुरू करण्यास पेडियाट्रिक टास्क फोर्सने विरोध केला होता . राज्यात बहुतांश शिक्षकांचे लसीकरण केले आहे . तरीही शाळा सुरु करण्याबाबत अद्याप संभ्रम आहे . काही शिक्षकांना कोरोना काळात इयुटी करावी लागल्याने त्यांचे लसीकरण करण्यात आले होते .

Post a Comment

0 Comments