सांगोला शहरात चोरांचा धुमाकूळ भरदिवसा चोरी केल्याने शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान
सांगोला ( प्रतिनिधी ) ; दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी सांगोला शहरातील कडलास रोड वरील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २ लाख ३० हजार रुपये चोरून नेहले असल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी राजेंद्र मीना ( रा . कडलास रोड , सांगोला ) यांनी सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी यांचे ओम साईराम नावाने फरशीचे दुकान आहे . दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता नेहमी प्रमाणे त्यांच्या घरातील लोक त्यांचे- त्यांचे कामावर गेले होते . सकाळी ९ वाजता फरशीच्या दुकानाला जाताना घराला कुलुप लावुन गेले होते . त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे चुलते मुकेश मीना असे दोघे ज्युस पिण्याकरीता घरी गेले . त्यावेळी घराचे कुलुप कोणीतरी तोडलेले असल्याचे दिसले.घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील कपाटाचे लॉक तुटलेले दिसले तर कपाटातील ड्रावर उघडून पाहिले असता ड्रावरच्या कप्यामध्ये फरशी विकून ठेवलेले २ लाख १० हजार रुपये पाहिले असता तेथे नव्हते .तसेच फिर्यादी हे वेळोवेळी बचतकरुन प्लास्टीकच्या गल्यात पैसे टाकत होतो . तो गल्ला कपाटातच ठेवलेला होता.तो गल्ल्याही फोडलेला दिसला . गल्यातील अंदाजे असेलेले २० हजार रुपये फुटलेल्या गल्यात नव्हते . असे एकूण २ लाख ३० हजार रुपये तसेच कपाटातील साहित्य , कपडे खाली अस्ताव्यस्त पडलेले होते . त्याचबरोबर कपाटात ठेवलेले पैसे , बँकांचे चेकबुक व इतर कागदपत्रे चोरीस गेले असल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे . चोर अनेक वेळा रात्री चोरी करत असतात परंतु सांगोला शहरांमध्ये दिवसा चोरी झाल्यामुळे चोरांना पकडण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे .


0 Comments