google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हॉटेल, रेस्तराँ, मॉल्स, सर्व दुकांनांनाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

Breaking News

हॉटेल, रेस्तराँ, मॉल्स, सर्व दुकांनांनाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

 हॉटेल, रेस्तराँ, मॉल्स, सर्व दुकांनांनाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी



राज्य मंत्री मंडळाचा निर्णय ; सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे यांना परवानगी नाही

मुंबई ;- राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे.. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.

 मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. याचबरोबर, सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. तर, त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे.आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. ज्यामधअये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत, त्या संदर्भात जो आता निर्णय झालेला आहे.

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे आणि असंही सांगितलं आहे की, खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 

त्याचबरोबर जी खासगी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी 24 तास खासगी कार्यालयं सुरू राहू शकतील, हा एक महत्वपूर्ण निर्णय़ आहे. कारण एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात 25 टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालयं सुरू ठेवता येतील, अशी सूचना करण्यात आलेली आहे.सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे

त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे. इनडोअर स्पोर्ट्समधील खेळाडू व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर, जे काही इनडोअर स्पोर्ट्स आहे त्यामध्ये मग बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी सर्व खेळांना परवानगी दिली गेली आहे.

Post a Comment

0 Comments