google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ' बचपन का प्यार ' गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी , 23 लाखांची कार , भावा होऊ दे हवा !

Breaking News

' बचपन का प्यार ' गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी , 23 लाखांची कार , भावा होऊ दे हवा !

 ' बचपन का प्यार ' गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी , 23 लाखांची कार , भावा होऊ दे हवा !


सोशल मीडियावर सध्या एकाच गाण्याची हवा आहे . जो बघतोय तो या गाण्यावर वेगवेगळे व्हिडीओ बनवताना दिसत आहे . विशेष म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गजांना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे . ते गाणं म्हणजे ' बचपन का प्यार ' ! छत्तीगडच्या सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्याने हे गाणं शाळेत गायलं . शाळेतील कुणीतरी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर चमत्कारच झाला . सोशल मीडियावर लोकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलं .

 हे गाणं गाणाऱ्या सहदेवचं एवढं कौतुक झालं की MG शोरुमच्या मालकाने त्याच्यावर खूश होऊन चक्क 23 लाखांची MG हेक्टर SUV गिफ्ट म्हणून दिली आहे . ही एक इलेक्ट्रिक कार आहे .आयुष्य बदलायला फार वेळ लागत नाही . त्यामुळे आयुष्याबद्दल फारसा विचार कधीच करायचा नाही . आपण प्रामाणिकपणे काम करायचं . फळ मिळायचं तेव्हा मिळेलच . पण आयुष्य मनसोक्तपणे जगायचं . कधी दु : खात , वाईट परिस्थित , तर कधी सुखात आणि चांगल्या परिस्थितीत समाधानाने आणि सकारात्मक विचारांनी आयुष्य जगत राहायचं . हीच गोष्ट आपल्याला छत्तीसगडच्या सहदेवकडे बघून शिकायला मिळतेय .

 सहदेवचे वडील शेतकरी आहेत . त्यांच्या घरात टीव्ही आणि मोबाईलही नाही . सहदेवने दुसऱ्या कुणाच्या मोबाईलवर गाणं ऐकलं होतं . ते गाणं ऐकूणच त्याच्या तोंडपाठ झालं होतं . त्याने हे गाणं त्याच्या शाळेत म्हटलं होतं . त्याच गाण्याने आज सहदेवचं आयुष्य बदलून टाकलं आहे . मुख्यमंत्र्यांनी सहदेवची भेट घेतली सहदेवचं गाणं लोकप्रिय झाल्यानंतर बॉलिवूड सिंगर बादशाह याने सहदेवशी व्हिडीओ कॉलवर बातचित केली होती . त्यानंतर त्याने त्यालाचंदिगडला भेटायला बोलावलं होतं . एवढंच नाही तर सहदेवचं गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेतली होती . 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहदेवला ते गाणं गावून दाखवण्याची फर्माईश केली होती . बघेल यांनी ते गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं . तसेच बचपन का प्यार , वाह , असंही कॅप्शन दिलं होतं .बादशाह सोबत नवं कोरं गाणं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंगर बादशाह हा सहदेव सोबत ' बचपन का प्यार ' हे नवं गाणं घेऊन येत आहे . या गाण्याची शूटिंग देखील संपली आहे . येत्या 11 ऑगस्टला हे गाणं प्रदर्शित होणार आहे . गाण्यात आपल्याला आस्था गिल देखील दिसणार आहे .https://twitter.com/i/status/1420019343182675972

https://twitter.com/bhupeshbaghel/status/1420019343182675972?s=08

Post a Comment

0 Comments