google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरांमध्ये मा. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा ठराव नगरपालिकेने करावा : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

Breaking News

सांगोला शहरांमध्ये मा. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा ठराव नगरपालिकेने करावा : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

 सांगोला शहरांमध्ये मा. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा ठराव नगरपालिकेने करावा : नगरसेवक सुरज दादा बनसोडे



सांगोला/प्रतिनिधी :सांगोला शहरांमध्ये मा. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांचा पुतळा सांगोला शहरांमध्ये बसवण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात यावा. अशी मागणी नगराध्यक्षा राणीताई माने यांच्याकडे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते मा. आम. गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यांमध्ये केलेली काम हे सर्व महाराष्ट्रापुढे आदर्शवत आहे. त्याच्यामुळे तालुका व शहरातील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी हे अगदी बिनधास्त होते. आबासाहेब हे सर्व तालुक्याची प्रेरणा होते.

 ज्यांनी 55 वर्ष विधानसभेत आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करून रेकॉर्ड नोंदविला आहे. म्हणून अशा आदर्श नेत्याचा पुतळा सांगोला शहरांमध्ये वाढेगाव नाका येथे बसवण्याचा प्रस्ताव येणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे चर्चा करून एकमताने मंजूर करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments