google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! अभ्यासावरून रागावते म्हणून मुलीने केली आईची हत्या

Breaking News

धक्कादायक! अभ्यासावरून रागावते म्हणून मुलीने केली आईची हत्या

 धक्कादायक! अभ्यासावरून रागावते म्हणून मुलीने केली आईची हत्या 


  ऐरोली से. ७ मध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आपल्या आईचा कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे आपल्या आईची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी मुलीने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून, 

आईच्या मोबाईलवरून नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवल्याचे तपासात आढळून आले आहे.गत ३० जुलै रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेतील मृत महिलेचे नाव शिल्पा जाधव (४१) असे असून ती

 ऐरोली से. ७ मधील राकेश सोसायटीत पती संतोष जाधव (४४) व १५ वर्षीय मुलगी, ६ वर्षांचा मुलगा यांच्यासह राहत होती.आणल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी जाधव दाम्पत्याची इच्छा होती. त्यासाठी ‘नीट’ परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे, यासाठी आई शिल्पा कायम तिच्यावर दबाव आणत होती.त्यामुळे दोघांमध्ये अभ्यासावरून नेहमी भांडण होत होते. हा वाद रबाळे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी पोलिसांनी मुलीची व तिच्या पालकांची समजूत काढली होती.

३० जुलैला आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरून रागावून तिला मारहाण केली होती. मारहाण करताना आईने हातात सुरी घेतल्याने मुलीला त्याचा राग आला.त्यामुळे तिने आईचा जोरदार प्रतिकार केला. दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आई खाली पडून तिच्या डोक्याला कॉटचा कोपरा लगला.त्यामुळे ती अर्धमेली होऊन पडल्यानंतरही तिने कापडी बेल्ट हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलीनेच बेल्टने आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळला.यामध्ये आईचा मृत्यू झाला. हत्येनंतर आईने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी मुलीने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून, आईच्या मोबाईलवरून नातेवाईकांना आत्महत्या करत 

असल्याचे मेसेज पाठवल्याचे तपासात उघड झाले.रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शैला जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे व गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले.पोलीस चौकशीत मुलीने आईची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रबाळे पोलिसांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी होऊन मुलीवर हत्या व परावे नष्ट केल्याप्रकरणी गन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments