बारावीचा आज लागणार निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या मंगळवार , दि . ३ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे . कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती . गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा , पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला आहे . पाऊस आणि पुरामुळे काही शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया लांबली होती . विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही उत्सुकता होती . जुलैअखेर इयत्ता १२ वीचा निकाल लागेल , असे म्हटले गेले होते . पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक कामे थांबली आहेत . यामुळे मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे . महाराष्ट्र सरकारने केरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता . महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी , अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे . या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल https://hscresult.11thadmission.org.in https://msbshse.co.in hscresult.mkcl.org mahresult.nic.in www.mahahsscboard.in


0 Comments