google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माळवाडी ( बोरगाव ) येथील गावगुंडांनी अंत्यविधी न करू दिल्यामुळे ग्रामपंचायतसमोर मुडदा जाळला

Breaking News

माळवाडी ( बोरगाव ) येथील गावगुंडांनी अंत्यविधी न करू दिल्यामुळे ग्रामपंचायतसमोर मुडदा जाळला

 माळवाडी ( बोरगाव ) येथील गावगुंडांनी अंत्यविधी न करू दिल्यामुळे ग्रामपंचायतसमोर मुडदा जाळला


अकलूज : मध्ये माळवाडी ( बोरगाव ) येथील गावगुंडांनी अंत्यविधी न करून दिल्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत समोर केला अंत्यविधी केला . सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे माळवाडी ( बोरगाव ) येथील मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे  दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री २ वाजता निधन झाले हो ते परंतु गावातील जातीयवादी गुंडप्रवृत्तीच्या समाजकंटकांनी त्यांचा अंत्यविधी स्मशान भुमीत करण्यास विरोध करुन अंत्यविधी कर दिला नाही परिणामी मयताची विटंबना करून मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडली 


असून सदर संतापजनक घटनेचा माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्र भर या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे मातंग समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व साठे यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत अकलूज पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हा नोंद केला . स्मशानभूमी म ध्ये अंत्यविधी करण्यासाठी विरोध करण्यात आल्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत अखेर साठे त्यांचा अंत्यविधी माळवाडी ( बोरगाव ) या ग्राम पंचायतीसमोर केला आहे .

Post a Comment

0 Comments