google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकबाकी भरुन महावितरण कार्यालयास सहकार्य करावे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार

Breaking News

थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकबाकी भरुन महावितरण कार्यालयास सहकार्य करावे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार

 थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकबाकी भरुन महावितरण कार्यालयास सहकार्य करावे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार


सांगोला / प्रतिनिधी : मार्च अखेर ४१ ९ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी वसूल  करण्यासाठी ट्रंसफार्मर चा विद्युत  पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू  केल्यानंतर तालुक्यातील राजकीय  नेते मंडळींच्या पुढाकाराने  थकबाकीदार वीजग्राहकांना मंगळवार  पर्यंत मुदत देत , तोपर्यंत कृषी पंपाचा  वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात  आला आहे .


 थकबाकीदार वीज ग्राहकांनी येत्या मंगळवारपर्यंत  थकबाकी भरून वीज कार्यालयास सहकार्य करावे , अन्यथा पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु  केली जाणार असल्याचा इशारा  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता  आनंद पवार यांनी दिला आहे . सांगोला तालुक्यातील शेती पंप , घरगुती , औद्योगिक व व्यावसायिक  आशा ५ ९ हजार ०२ विज ग्राहकांकडे  मार्चअखेर ४१ ९ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे . सदरच थकबाकी वसूल करण्यासाठी सांगोला  महावितरण कार्यालयाकडून ट्रंसफार्मरचा वीज पुरवठा खंडित  करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती . दरम्यान विविध राजकीय पक्षाकडून ट्रंसफार्मर सुरू करून शेतकयांना व वीज ग्राहकांना दिलासा  द्यावा अशी मागणी करण्यात आली होती .


 त्यानुसार काल शुक्रवार दि . २०रोजी महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी तालुक्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नेतेमंडळींना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली . सदर चर्चात्मक निर्णयानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या मागणीनुसार सांगोला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत वेळेनुसार सुरू करण्यात आला . सांगोला महावितरण कार्यालयाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यात ३३ हजार ८०३ शेतीपंपाचे ग्राहक आहेत . यापैकी ३१ हजार ६६५ शेती पंप विज ग्राहकांकडे कृषी वीज धोरण २०२० नुसार माफीसह मार्च २०२१ अखेर ४१२ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे . तर घरगुती , औद्योगिक व व्यावसायिक असे एकूण ४२ हजार ५२० ग्राहक आहेत . 


 पैकी २७ हजार ३३७ विज ग्राहकांकडे ६ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी आहे . असे एकुण शेती पंप , घरगुती , औद्योगिक व व्यावसायिक आशा ५ ९ हजार ०२ विज ग्राहकांकडे मार्चअखेर ४१ ९ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे . सदरची थकबाकी वसूल करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार सांगोला महावितरण कार्यालयाकडून कारवाईची  तीव्र राबवली जात आहे .

 यामध्ये मार्च महिन्यातील कारवाई प्रमाणेच थकबाकी वसूल करण्यासाठी ठंसफार्मर चा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई राबवली जात आहे . वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाई मध्ये सांगोला तालुक्यातील बहुतांशी गावांमधील ट्रंसफार्मर चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे . परिणामे शेतकन्यांमधून वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावा अशी मागणी होत असताना , तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नेते मंडळींनी पुढाकार घेत , तर काही नेते मंडळींनी आक्रमक भूमिका घेत , थकबाकीदार वीजग्राहकांना विज बिल भरण्यासाठी मुदत द्यावी परंतु तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी लावून धरली होती . 


शेतकन्यांच्या मागणीनुसार विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी केलेल्या मागणीवरून सांगोला उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून नेतेमंडळींची चर्चा घडवून आणली . सदर चर्चात्मक निर्णयानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या मागणीनुसार सांगोला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत वेळेनुसार सुरू करण्यात आला .

Post a Comment

0 Comments