'तू मला सोडून कशी राहतेस' या कारणावरून शिवीगाळ करून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात बांबू मारून तिला जखमी केले.
सोलापूर : 'तू मला सोडून कशी राहतेस' या कारणावरून शिवीगाळ करून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात बांबू मारून तिला जखमी केल्याची घटना २९ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जुनी लक्ष्मी चाळ डोणगाव रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी प्रीती युवराज हिंगमिरे (वय-३८,रा. जुनी लक्ष्मी चाळ डोणगाव रोड, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यांच्या फिर्यादीवरून पती युवराज मल्लिनाथ हिंगमिरे (वय-४०, रा.लक्ष्मी चाळ डोणगाव रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी चपाती युवराज याने प्रीती यांच्या घराच्या मागील असलेल्या जिन्यातून खोलीत प्रवेश केला. त्यानंतर 'तू मला सोडून कशी राहतेस' असे प्रीती यांना म्हणून शिवीगाळ करून घरातील लाकडी बांबूने डोक्यात मारून दुखापत केली. त्यानंतर प्रीती यांच्या दोन्ही लहान मुलांना सोबत घेऊन युवराज निघून गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक घाटे हे करीत आहेत.


0 Comments