राजमाता क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू श्रीशैल्य ज्ञानेश्वर तेली व ओम गणेश गुळमिरे यांची जिल्हा क्रिकेट संघात निवड.
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला येथील राजमाता क्रिकेट अकॅडमीचे अष्टपैलू खेळाडू श्रीशैल्य ज्ञानेश्वर तेली व ओम गणेश गुळमिरे याची 16 वर्षाखालील सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. यापूर्वी ते दोघे ही 14 वर्षाखालील वयोगटामध्ये खेळले आहेत. त्याच्या या निवडीबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक आनंदा माने यांनी शुभेछा दिल्या. तसेच या दोघाना राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments