google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची सटकली , म्हणाले - ' कलेक्टर साहेब , 2 एकर गांजा लावू द्या की . '

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची सटकली , म्हणाले - ' कलेक्टर साहेब , 2 एकर गांजा लावू द्या की . '

 सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची सटकली , म्हणाले - ' कलेक्टर साहेब , 2 एकर गांजा लावू द्या की . '


सोलापूर :  वेळेवर पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. शेतात चांगले पीक आले तर त्याला योग्य भाव मिळत नाही.त्यामुळे शेतकरी चारीबाजूंनी संकटात सापडला आहे. त्यामुळे सोलापूर  जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकारी  यांना पत्र लिहले असून यामध्ये गांजा पिकवण्याची परवानगी  द्यावी अशी मागणी केली आहे. सोलापूर  जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील  शिरापूर येथील अनिल आबाजी पाटील  यांनी हे पत्र लिहले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर  प्रचंड व्हायरल होत आहे.


शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने माझ्या दोन एकर शेतात गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन अनिल पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिले आहे. अनिल पाटील यांची शिरापूर (सो) येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं.181/4 असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे निवेदन जिल्हा व पोलीस प्रशासनाला  दिले आहे.


अनिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला (sugar factory) ऊस गाळपासाठी दिला तर त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही.त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या दोन एकरमध्ये गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी.गाजा लागवडीची परवानगी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत लेखी स्वरुपात द्यावी.अन्यथा मी 16 सप्टेंबर 2021 या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहीत धरुन मी गांजाची लागवड सुरु करणार आहे.माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असेही पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments