google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालय येथे ई.सी.एस-भाग १ या वर्गाच्या दुसऱ्या तुकडीसाठी शासनाची मान्यता

Breaking News

विज्ञान महाविद्यालय येथे ई.सी.एस-भाग १ या वर्गाच्या दुसऱ्या तुकडीसाठी शासनाची मान्यता

 विज्ञान महाविद्यालय येथे ई.सी.एस-भाग १ या वर्गाच्या दुसऱ्या तुकडीसाठी शासनाची मान्यता


सांगोला / प्रतिनिधी- विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे बी.एस्सी(ई.सी.एस)-भाग १ या वर्गाच्या दुसऱ्या तुकडीसाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासंदर्भात जी अडचण येत होती ती आता दूर होणार आहे. पूर्वी बी.एस्सी(ई.सी.एस)-भाग १ या वर्गासाठी शासनाची एका तुकडीसाठी मान्यता होती त्यामुळे फक्त ८० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येत होता. आता नुकतीच दुसऱ्या तुकडीसाठी शासनाने मान्यता दिल्यामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी १६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. विज्ञान महाविद्यालय, सांगोला हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मधील नामांकित महाविद्यालय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नेहमीच प्राधान्य असते. बी.एस्सी(ई.सी.एस)-भाग १ या वर्गाच्या दुसऱ्या तुकडीसाठी शासनाची मान्यता मिळाल्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.  संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख व संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून बी.एस्सी(ई.सी.एस)-भाग १ या वर्गाच्या  दुसऱ्या तुकडीसाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. रघुनाथ फुले व संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.हणमंत कोळवले यांनी बी.एस्सी(ई.सी.एस)-भाग १ या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविदयालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments