बेपत्ता होण्याच्या प्रमाणात होतेय वाढ! मंगळवेढ्यातून महिला मुलासह बेपत्ता
मंगळवेढा शहरातील हजारे गल्ली येथून एक २५ वर्षीय महिला आपल्या दीड वर्षाच्या मुलासह अचानकपणे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सदर महिला दि.९ जुलै रोजी सायंकाळी ७.०० ते ८.०० च्या दरम्यान हजारे गल्ली येथील राहते घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली.सदर महिला अंगाने सडपातळ असून रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, उंची ५ फुट , अंगात पोपटी रंगाचा टी शर्ट , व काळया रंगाची लेगीज असून तीला मराठी भाषा बोलता येते.तसेच त्या दीड वर्षीय मुलाच्या अंगात लाल रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची पँट असून त्याचा रंग सावळा व चेहरा गोल आहे.याची खबर त्या महिलेच्या वडीलांनी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार तुकाराम कोळी हे करीत आहेत.
0 Comments