सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या अध्यापनाची प्रक्रिया मराठी- इंग्रजी( द्विभाषिक) पद्धतीने राबविण्यात येण दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आत्मविश्वासाने अभियांत्रिकी पदविकेचा अभ्यासक्रम आत्मसात करतील असे मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा इंग्रजी- मराठी अभ्यासक्रम निवडणे ऐच्छिक असून ते आपल्या इच्छेप्रमाणे माध्यम निवडू शकतात. या नवीन शैक्षणिक बदलामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची असणारी भीती व न्यूनगंड कमी होऊन अधिकाधिक विद्यार्थी तंत्रशिक्षण उत्कृष्टपणे आत्मसात करतील अशी माहिती प्राचार्य डॉ. देशमुख यांनी दिली. सध्या शैक्षणिक वर्ष 2021- 22 ची प्रवेश प्रक्रिया सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक बदलाचा फायदा घेऊन अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष. श्री. बी. आर. गायकवाड यांनी केले. पालकांनी व विद्यार्थ्यांनी प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया संबंधी माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये सुरू असलेल्या सुविधा केंद्रास भेट द्यावी असेही आव्हान त्यांनी केले.
0 Comments