संशोधनाचा दावा - "ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना Covishield च्या दुसर्या डोसची आवश्यकता नाही"
जे लोकं कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे झाले आहेत त्यांना कोरोना व्हॅसिनचा दुसरा डोस घेण्याची आवश्यकता नाही. एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. एका न्यूज चॅनेलच्या अहवालानुसार, आयसीएमआर नॉर्थ-ईस्ट (ICMR) आणि आसाम मेडिकल कॉलेजच्या अभ्यासानंतर असा दावा केला गेला आहे की, ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यातून ते बरे झाले आहेत, त्यांना सीरम इन्स्टिट्यूटची व्हॅक्सीन कोविशिल्ड (SII Covishield) च्या दुसर्या डोसची आवश्यकता नाही.या संशोधनात असे म्हटले गेले आहे की, कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर या विषाणूविरूद्ध मनुष्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती आधीच तयार होते आहे. अशा परिस्थितीत, कोविशिल्डचा एक डोस शरीरात विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण करतो. या अहवालात असेही म्हटले गेले आहे की, यामुळे देशातील लोकांना लस देण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि लसीअभावी लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही.अहवालानुसार तज्ञांच्या एका पथकाने 18 ते 75 वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांवर संशोधन केले. यामध्ये, IgG अँटीबॉडीज शरीरात तीन कालावधीत अनुमानित होते. पहिल्या कालावधीतील लसीकरणानंतरचे मूल्यांकन, दुसऱ्या कालावधीतील लसीकरणानंतर 25-35 दिवस आणि तिसर्या कालावधीतील लसच्या दुसऱ्या डोसनंतर 25-35 दिवसांचा समावेश आहे.गुरियन बेरी सिंड्रोम होतो आहे त्याच वेळी, दुसर्या एका अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, कोविशिल्ड लसीमुळे काही लोकांना ‘गुलियन बेरी’ हा दुर्मिळ आजार होत आहे. हे मज्जासंस्थेमध्ये उपस्थित इम्यून सिस्टम, हेल्दी टिशूजवर परिणाम करते. विशेषत: या सिंड्रोममुळे ग्रस्त लोकांच्या चेहऱ्याच्या नसा कमकुवत होतात. या अभ्यासानुसार, लस घेतल्यानंतर भारतात या आजाराची सात प्रकरणे नोंदली गेली आहेत. या सात जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस मिळाला होता आणि त्यानंतर 10 ते 22 दिवसांच्या दरम्यान, त्यांच्यात गुलियन-बेरी सिंड्रोमची लक्षणे दिसू लागली.एनल्स ऑफ न्यूरोलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांना लस घेतल्यानंतर गुरियन-बेरी सिंड्रोम रोग झाला आहे, त्यांच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत, मात्र त्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा कमी केस आढळल्या आहेत. संशोधकांनाही आश्चर्य वाटते आहे की, एवढ्या कमी वेळात हा रोग अपेक्षेपेक्षा वेगाने पसरला.


0 Comments