google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कायद्याचा रक्षकच बनला भक्षक ! पोलिस निरीक्षकाने केला महिला कॉन्स्टेबलचा बलात्कार

Breaking News

कायद्याचा रक्षकच बनला भक्षक ! पोलिस निरीक्षकाने केला महिला कॉन्स्टेबलचा बलात्कार

 वाशिम / प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या विश्वकांत गुट्टे याने वाशिम येथे एका महिला कॉन्स्टेबलचा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे .


याप्रकरणी पिडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांनी गुट्टेवर गुन्हा दाखल केला आहे . एकंदरीतच या धक्कादायक घटनेमुळे कायद्याचा रक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत आहे . तसेच पोलिस निरीक्षकावरच गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात तसेच वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , पिडीत महिला कॉन्स्टेबलने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले की , आरोपी विश्वकांत गुट्टे हा २००७ मध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता . त्यादरम्यान त्याच्याशी ओळख झाली . त्याचा गैरफायदा घेत ३० मे २०२१ रोजी आरोपीने वाशिममध्ये माझ्या घरी येऊन जबरदस्ती करत बलात्कार केला . अशा आशयाच्या तक्रारीवरून आरोपी विश्वकांत गुट्टे याच्यावर शहर पोलिसांत कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांनी सांगितले .



Post a Comment

0 Comments