google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! सुशांतसिंगचा स्टेटसवर फोटो ठेवत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात घटना

Breaking News

धक्कादायक! सुशांतसिंगचा स्टेटसवर फोटो ठेवत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात घटना

धक्कादायक! सुशांतसिंगचा स्टेटसवर फोटो ठेवत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात घटना


दुपारी मोबाइल स्टेटसवर सुशांतसिंगचा फोटो ठेवत सायंकाळी टमटमचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार माढा तालुक्यात लऊळ येथे घडला. या प्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली.नितीन सर्जेराव चांदणे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी नितीनचा विवाह झाला होता. तो अनेक दिवसांपासून टमटम रिक्षा चालवत होता.लॉकडाऊनकाळात हा व्यवसाय बंद असल्याने तो ट्रॅक्टर चालवून शेतीकामे करीत गुजराण करीत होता. दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्याने स्वत:च्या मोबाइल व्हाॅट्सॲपवर चार भावनिक स्टेटस ठेवले.अनेकांनी त्याचे स्टेटस पाहिले. सायंकाळी साडेपाच वाजता नितीनने अज्ञात कारणावरून राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने लटकवून घेत आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा लटकलेला मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.कुणावर तरी प्रेम करणं खूप सोपं त्याने आत्महत्येपूर्वी मोबाइलवर ठेवलेले स्टेटस हे भावनिक होते. कितना अंधेरा राहू में यारा, किसका बना अब कौन सहारा, अब न कोई सूरज हैं, ना कोई सबेरा ही कव्वाली, तर जन्म कब लेना हैं, और मरना कब हैं, हम डीसाईड न कर सकते, पर कैसे जिना है, हम डीसाईड कर सकते हैं, ही कॅप्शन सुशांतसिंगचा फोटो टाकून, याबरोबरच कुणावर तरी प्रेम करणं खूप सोपं असतं,पण खूप अवघड असतं की, व्यक्ती आपली होणार नाही, हे माहिती असूनही तिच्यावर प्रेम करणं, काय करता भांडून, चिडून, रागावून बोलणं बंद करून, उद्या जिवंत राहतो की नाही ते पण नाही माहीत आपल्याला, कोणाला नाराज नका करू, फक्त आनंदात राहा, असा संदेश त्याने स्टेटसच्या माध्यमातून दिला आहे.

Post a Comment

0 Comments