वजनात ' झोल करणाऱ्या रेशन दुकानदारांना झटका ; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय विनायक सावंत -
सोलापूर प्रतिनिधी , दि .२३ : अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे . केंद्र सरकारने रेशनच्या दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल ( EPOS ) उपकरणांना इलेक्ट्रॉनिक तराजूशी जोडण्याचा नवा नियम लागू केला आहे . त्यामुळे रेशनच्या दुकानांवर धान्याचे वजन करताना होणारी ग्राहकांची फसवणूक आता बंद होईल . राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमानुसार ( NFSA ) देशातील ८० कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला पाच किलो तांदूळ आणि गहू माफक दरात दिले जात आहेत . तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत केंद्र सरकार नोव्हेंबर २०२१ महिन्यापर्यंत रेशन कार्डधारकांना पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत वाटणार आहे . केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य स्वागत करत असून याप्रमाणे राज्य सरकारने यावरती त्वरित प्रक्रिया करुन होणाऱ्या भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष विनायक सावंत यांनी व्यक्त केले .


0 Comments