google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना (भाऊ )पटोले यांच्या उपस्थितीत ॲड. महादेव कांबळे यांचा काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश.

Breaking News

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना (भाऊ )पटोले यांच्या उपस्थितीत ॲड. महादेव कांबळे यांचा काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश.

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना (भाऊ )पटोले यांच्या उपस्थितीत ॲड. महादेव कांबळे यांचा काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश.


सांगोला (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवन दादर मुंबई येथे सांगोल्याचे ॲड. महादेव कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला . देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती ताई शिंदे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग  विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी  सोमवार दिनांक 28 जून रोजी मुंबई येथे प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, मुंबई प्रदेश सचिव विकास तांबे, अनुसूचित जाती विभाग  राज्य समन्वयक प्राध्यापक शहाजी पारसे, सोशल मीडिया चे प्रशांत पवार, तसेच बीड जिल्हा अध्यक्ष दत्ता कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक दत्तात्रय वाघमारे, दयानंद आईवळे, गणेश हेगडे, नवनाथ ढोबळे, चंद्रकांत पारसे व इतर निवडक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.ॲड. महादेव कांबळे हे उत्तम कवी व नामवंत वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत .मुंबई विद्यापीठामध्ये बीए भाग 1 कंपल्सरी मराठी या विषयात त्यांच्या पुस्तकातील कवितेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. सांगोला तालुक्यांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्याचा उपयोग पक्षवाढीसाठी होईल .काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य प्राध्यापक पी सी झपके सर, जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील, सांगोला तालुका अध्यक्ष राजकुमार पवार, ओबीसी सेल शहराध्यक्ष फिरोज मनेरी यासह सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ॲड. महादेव कांबळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments