विवाहितेच्या आत्महत्ते प्रकरणी सासूचा जामीन नामंजुर !
दि .२५ / ०५ / २०२१ रोजी मौजे लक्ष्मी नगर( दंडाचीवाडी) ता . सांगोला येथील मयत राधिका दऱ्याप्पा गोडसे हिस नवरा दऱ्याप्पा मोहन गोडसे व सासु शारदा मोहन गोडसे यांनी माहेरुन १ लाख रुपये घेऊन ये म्हणून केलेल्या जाच हट्टास कंटाळून लक्ष्मीनगर (दंडाचीवाडी) येथील राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती . त्यासंदर्भात मयताचे वडील मारुती बाळू करचे राहणार इटकी , ता . सांगोला , जि . सोलापूर यांनी सांगोला पोलीसात मयत मुलीचा नवरा दऱ्याप्पा मोहन गोडसे व शारदा मोहन गोडसे यांच्या विरुध्द गु.र.नं .६३१ / २०२१ भा.द.वि. कलम ४९८ ( अ ) , ३०४ ( ब ) व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता . त्याप्रमाणे पोलीसांनी वरील आरोपीस अटक केली होती . सदर अटक आरोपी सासु शारदा गोडसे हिने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीना करीता अर्ज दाखल केला होता . सदर जामीन अर्जाच्या कामी आरोपीच्या वकीलांचा व सरकारी वकील वांगीकर व मुळ फिर्यादीचे वकील विजय साहेबराव बेंदगुडे यांचा युक्तीवाद ऐकुन जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री . एन.के. मोरे साहेब यांनी सासु शारदा मोहन गोडसे हिचा जामीन अर्ज फेटाळला . सदर जामीन अर्जाचे काम मुळ फिर्यादीकडून अँड . अमोल गोरख देसाई ॲङ संतोष सु .भोसले , ॲङ राजेंद्रप्रसाद अ . पुजारी , ॲङ विशाल ग . वाघेला , ॲङ विजय सा बेंदगुडे , ॲङ शेखर गोडगे यांनी काम पाहिले .


0 Comments