google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा ग्रामीणसाठी दुकानाच्या वेळा पुन्हा निश्चित ! उद्यापासूनचे निर्बंध जैसे थे ! सोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यातच !

Breaking News

सोलापूर जिल्हा ग्रामीणसाठी दुकानाच्या वेळा पुन्हा निश्चित ! उद्यापासूनचे निर्बंध जैसे थे ! सोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यातच !

 सोलापूर जिल्हा ग्रामीणसाठी दुकानाच्या वेळा पुन्हा निश्चित ! उद्यापासूनचे निर्बंध जैसे थे ! सोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यातच !


सोलापूर - सोलापूर जिल्हा ग्रामीणचा ( सोलापूर महापालिका वगळून ) कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 5.10 टक्के असून ऑक्सिजन बेडची टक्केवारी वीस असल्याने ग्रामीण भाग हा तिसऱ्या टप्प्यात मोडत असून येथील अनलॉकची स्थिती ही जैसे थे राहणार आहे . म्हणजेच सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने ही दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवांच्या अस्थापना वगळता सर्व बंद असणार आहे . याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत .


राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉकसाठी टप्पे ठरवून दिले असून यात पाच स्तर करण्यात आले आहेत . 7 जून रोजी सोलापूर शहरासह जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने येथे सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सर्व दुकानांना परवानगी होती .

तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्य सेवांची दुकाने उघडण्यास मान्यता होती . प्रत्येक आठवड्याला याचा आढावा घेतला जात असून आता उद्या 14 जून पासून सोलापूर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 2 टक्के असल्याने तो दुसऱ्या टप्प्यात आला असल्याने तेथील निर्बंध आता कमी करण्यात आले आहेत . शाळा , महाविद्यालय , प्रार्थनास्थळ सोडून अन्य व्यवहार पूर्वपदावर आणण्यात आल्याचे महापालिकांनी आयुक्तांनी कळविले आहे .

Post a Comment

0 Comments