मुंबईतील महिला पोलीस अधिकायावर बलात्कार सोशल मीडियातून झालेली ओळख ठरली घातक
मुंबई - मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने , आपल्यावर एका इसमाने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे . लग्नाचे आमिष दाखवून या इसमाने आपले लैंगिक शोषण केले , अशी तक्रार तिने पवई पोलिसांकडे केली आहे .सदर इसमाशी संबंधित अन्य दोन जणांच्या विरोधातही तिने तक्रार दाखल केली आहे . त्यांनी आपल्याला धमकावले व ब्लॅकमेलिंग केले असे तिचे म्हणणे आहे . यातील मुख्य आरोपी औरंगाबादचा आहे . तो बँकेचा अधिकारी असल्याचे तो सांगतो . सदर महिली पोलीस अधिकाऱ्याची त्याची सोशल नेटवर्क साईटवर भेट झाली . नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले . आरोपींनी या महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले आणि त्या आधारावर तो या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकाऊ लागला . हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही या तीन जणांनी सतत दिली . त्या छळाला कंटाळून सदर महिला अधिकाऱ्याने ही तक्रार दाखल केली आहे . पवई पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे .
0 Comments