' मला सहन होत नाही , मी आत्महत्या करतेय ' , व्हिडीओ शेअर करत तरुणीने केली आत्महत्या
" मी आयुष्याच्या स्पर्धेत जास्त टिकू शकत नाही . कारण , सर्व गोष्टी सहनशीलतेच्या पलिकडे गेलेल्या आहेत . मी आत्महत्या करणार आहे . माझ्या आत्महत्येला कोणीही कारणीभूत ठरवू नका . मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे " , असं सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून सांगत डोळ्यांत अश्रू ढाळत सोनू शेख या मुलीने आत्महत्या केली . तिची वेदना पाहून नेटकरी भावनाविवश झाले . ही घटना लातूर शहरात घडली आहे . सोनू शेख ही एका खासगी महाविद्यालयात बी.एच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती . ती पार्ट टाईम जॉबदेखील करत होती . तिने आपल्या आयुष्यातील वेदना सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून मांडला . डोळ्यांतून अश्रू ढाळत आत्महत्या करणार असल्याची ती सांगत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . व्हिडीओमध्ये म्हणते की , " मला हे सगळ सहन होत नाही . मी आत्महत्या करत आहे . माझ्या मरणानंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका " , असंही तिने म्हंटलेलं आहे . आयुष्याच्या परिक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही . मला जे कोणी जवळचे मानतात , त्यांनी फक्त अधूनमधून येऊन माझ्या आईची विचारपूस करावी . मला माहितीय की , माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला खूप त्रास होणार आहे " , असंही सोनू शेख व्हिडीओमध्ये सांगत आहे .पोलिसांकडून असं सांगण्यात येत आहे की , सोनूच्या आईशी कोणीतरी फोनवर बोलत होतं . त्या बोलण्यातून त्यांच्यात भांडणही झालं होतं . यातून टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . सोनूने आत्महत्या केली तेव्हा घरात कोणीच नव्हतं . तिची आई कामावर गेली होती , तिचे वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते , अशी माहिती लातूर पोलिसांनी दिली .
0 Comments