लसीकरणाबाबत ग्रामीण रुग्णालयाचा सावळागोंधळ --ज्याचा वशिला त्यांनीच जावे लसीला...
सांगोला प्रतिनिधी :देशभरामध्ये कोरोणाच्या पहिल्या लाटे नंतर दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर येऊन सांगोला तालुक्यातील आजअखेर 114 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच कोरोणा रुग्णांच्या संस्थेमध्ये एक मे रोजी पासून ते आज अखेर बाधित रुग्ण सापडत आहेत. तरीही सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी मात्र कोणत्याही प्रकारची जबाबदारी याविषयी उचलली नसल्याचे दिसत आहे.खरे पाहता मे महिन्यामध्ये रुग्णालयाकडून तालुक्यातील नागरिकांना मोफत कोव्हिड सेंटर उभा करणे आवश्यक होते. मे महिना संपला तरीही यांचे डोळे उघडले नाहीत. आता जून महिना संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोणत्याही ठोस उपाययोजना आपणास दिसून येत नाहीत. ठराविक कोरोणा बाधित रुग्ण येथून बरे झाल्याची दिसते. परंतु वस्तुस्थिती पाहता ग्रामीण रुग्णालय सांगोला वैद्यकीय अधीक्षक या गोष्टीकडे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.ग्रामीण रुग्णालय येथे मोफत कोव्हिड सेंटर उशिरा सुरू करण्यात आले. तरीही या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच काही नागरिकांना वशिलेबाजी करून लसीकरण केल्याचा चर्चा सांगोला तालुक्यांमध्ये सुरू आहे.वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सांगोला यांच्याकडून ठोस पावले अजून का?उचलली गेली नाहीत. हा प्रश्न नागरिकाकडून होत आहे. का प्रशासनाच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढण्याचे प्रकार सुरू आहेत. का ग्रामीण रुग्णालयांमध्ये तालुक्यातील नागरिक लसीकरण मोफत कोव्हिड सेंटर विषयी विचारणा करण्यास गेल्यास वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून टाळाटाळीची उत्तरे देण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांना कधी गंभीर पणा येईल चांगल्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालयांमध्ये काम करता येत नसेल तर खुर्ची वरती का बसावे हा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.ज्यावेळी ग्रामीण रुग्णालयांमध्ये उशिरा सुरू करण्यात आलेल्या मोफत कोव्हिड सेंटर मध्ये डॉक्टरांकडून कशा पद्धतीने सुविधा बाधित रुग्णांना देण्यात येतील याविषयी चर्चा करण्यात आली होती. परंतु आज या मधील कोणतेही काम झाले नाही.सर्वसामान्य,गोरगरीब नागरीक ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आजाराविषयी उपचार घेण्यासाठी येत असतात. नागरिक वैद्यकीय उपचार होतील या आशेपोटी येत असतात .जाताना त्यांची निराशा झालेली दिसते. कारण वेगवेगळ्या आजाराविषयी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुविधा देण्यात येत नसल्याचे दिसते. खरे पाहता ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व आजारावरती उपचार होणे अपेक्षित आहे.सांगोला ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा विविध रोगावरती देण्यात याव्यात.जेणेकरून सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना खासगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करावा लागणार नाही. आज खाजगी दवाखान्या मध्ये लाखो रुपये दवाखान्याची बिल घेतले जात आहेत.सर्व रोगावरती ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुविधा दिल्यास गोरगरिबांना याचा आधार मिळून आर्थिक बचत होईल.ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा झाल्यास खाजगी दवाखान्यामध्ये होणारी आर्थिक लूट नागरिकांची थांबण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल.


0 Comments