धक्कादायक : 8 महिन्याच्या मुलास पोटाला बांधून महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या कराड तालुक्यातील कासारशिरंबे येथील घटना
तालुक्यातील कासारशिरंबे येथे आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन 23 वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली . ही घटना पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली . राजश्री शंकर रासकर वय 23 , मुलगा शिवतेज वय 8 ( दोघे रा . कडेगाव जि . सांगली ) अशी मृतांची नावे आहेत .याबाबत वनिता बबन दगडे ( वय 40 , रा . काटकर मळा , कासारशिरंबे ) यांनी कराड ग्रामीण पोलिसांत खबर दिली आहे . वनिता व त्यांचे पती बबन हे दोघे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या पालकराचा मळा नावाच्या शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी निघाले होते .


0 Comments