सांगोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सहायक पोलीस फौजदार साहेबराव सुदाम गायकवाड हे दिनांक ३१ मे २०२१ रोजी पोलीस खात्यातील तब्बल ३ ९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले . त्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ सांगोला पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला .
त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार करून पोलीस स्टेशनच्या मुख्यद्वारा पासून प्रवेशद्वारा पर्यंत पुष्पवृष्टी करण्यात आली . तसेच शेवटी पोलीस स्टेशनच्या सरकारी गाडीतून घरी नेऊन सोडण्यात आले , यावेळी श्री . गायकवाड यांच्या देहबोलीतून समाधानी निवृत्ती स्पष्ट नजरेस पडत होती . सन १ ९ ८२ साली साहेबराव गायकवाड यांनी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मुंबई येथून पोलीस दलातील सेवेस सुरुवात केली होती . त्यानंतर त्यांनी नातेपुते , माळशिरस , पंढरपूर , बार्शी , कामती आणि सांगोला आदी पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावली आहे . अत्यंत शांत आणि संयमी पोलीस म्हणून त्यांची सांगोला पोलीस स्टेशनमध्ये ओळख होती . सर्वात शांत आणि अनुभवी पोलीस कर्मचारी असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा नवख्या पोलीस बांधवांना झाला असल्याचे काही पोलीस कर्मचारी यांनी सांगितले . सांगोला या मायभूमीतच समंजस सेवा बजावत सेवानिवृत्ती घेत असताना अनेक परिचित मान्यवरांनीही सांगोला तालुक्याचे सुपुत्र असलेल्या साहेबराव गायकवाड यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . आत्ताच्या धकाधकीच्या युगात ३ ९ वर्षे सेवा पोलीस खात्यात सन्मानपूर्वक पूर्ण करणे हे नक्कीच कौतुकास्पद असून त्यांना निरोप देताना अनेकांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले . यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास स.पो.नि. नागेश यमगर , प्रशांत हुले , स.पो.फौ. कल्याण ( बापू ) ढवणे , संजय राऊत , रमेश ननवरे , आप्पासो कर्चे , पो.ना. अप्पासाहेब पवार , पो.कॉ. सिध्दनाथ शिंदे , रामचंद्र
जाधव यांच्यासह सांगोला पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी , होमगार्ड आदी उपस्थित होते .


0 Comments