google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायतीसाठी सन 2020-25 या कालावधीसाठी सरंपच आरक्षण सोडत करणेकामी प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करून दिलेले आहे .मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी सोलापूर

Breaking News

ग्रामपंचायतीसाठी सन 2020-25 या कालावधीसाठी सरंपच आरक्षण सोडत करणेकामी प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करून दिलेले आहे .मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी सोलापूर

 ग्रामपंचायतीसाठी सन 2020-25 या कालावधीसाठी सरंपच आरक्षण सोडत करणेकामी प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करून दिलेले आहे .मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी सोलापूर 


सरपंच आरक्षण सोडत -2020 ते 2025 ज्याअर्थी , वाचा क्रमांक 1 अन्वये सोलापूर जिल्हयातील 1028 ग्रामपंचायतीसाठी सन 2020-25 या कालावधीसाठी सरंपच आरक्षण सोडत करणेकामी प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करून दिलेले आहे . ज्याअर्थी , वाचले क्रमांक 03 अन्वये तहसिलदार बाशी , उत्तर सोलापूर , मोहोळ , पंढरपूर , माळशिरस , मंगळवेढा , सांगोला , दक्षिण सोलापूर यांनी सरपंच निवडीच्या प्रथम सभेनंतर रिक्त असणाऱ्या सरपंच पदाबाबतचा अहवाल सादर केला आहे , ज्याअर्थी मुंबई ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियम 4 अ नुसार या नियमात काहीही अंतर्भूत असले तरी , ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद अनु , जाती , अनु . जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग , ( विमुक्त जाती व भटक्या जमाती यांसह ) याकरिता राखीव असेल आणि अशा जाती किंवा जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमाती यांसह ) यामधून निवडून आलेला सदस्य उपलब्ध नसेल तर , या अधिनियमाच्या कलम 30 अन्वये ज्या प्रवर्गासाठी सरपंचाचे पद आरक्षित ठेवता येते त्यापैकी कोणत्याही एका प्रवर्गासाठी असे पद तेवढ्याच पदावधीसाठी सोडत पध्दतीने नेमून देण्यात येईल . परंतु , ज्यावेळी सरपंचाचे पद विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असेल व तेथे तो प्रवर्ग धारण करणारा एकच सदस्य निवडून आलेला असेल आणि त्याने नामनिर्देशनपत्र दाखल केलेले असेल त्या बाबतीत असे पद त्या सदस्याला दिल्याचे जाहीर करण्यात येईल आणि जर तो विशिष्ट प्रवर्ग धारण करणारे एकापेक्षा जास्त सदस्य निवडून आले असतील आणि त्यापैकी कुणीही नामनिर्देशनपत्र दाखल केले नसेल तर या अधिनियमाच्या कलम 30 अन्वये ज्या प्रवर्गासाठी सरपंचाचे पद आरक्षित ठेवता येते त्यापैकी कोणत्याही एका प्रवर्गासाठी सोडत पध्दतीने असे पद तेवढ्या मुदतीपुरते नेमून देण्यात येईल , परंतु , आणखी असे की , ज्या वेळी सरपंचाचे पद अनु , जाती , अनु . जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमाती यांसह ) यामधील महिलांसाठी आरक्षित असेल व उक्त जाती , जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यामधील महिला व सदस्य कोणत्याही कारणाने उपलब्ध नसल्यास , सरपंचाचे पद तेवढ्या मुदतीपुरते ( 1 ) जर मूलत : अनु . जातीच्या महिलांसाठी असेल तर अनु . जातीसाठी ( 2 ) जर मूलत : अनु . जमातीच्या महिलांसाठी असेल तर अनुसूचित जमातीसाठी ( 3 ) जर मूलतः नागरिकांचा मागासवर्गाच्या महिलांकरिता असेल तर नागरिकांच्या मागासवर्गासाठी आरक्षित असल्याचे समजण्यात येईल अशी तरतुद आहे . सबब , खालील नमुद तक्त्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे सन 2020-2025 या कालावधीचे दिनांक 27/01/2021 व दिनांक 22/02/2021 रोजी घेण्यात आलेली सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्णपणे रह करुन पुन : श्च घेणे क्रमप्राप्त आहे  उत्तर सोलापूर-खेड .पंढरपूर- शेंडगेवाडी .सांगोला - निजामपुर ,खिल्लार वाडी,    हणमंतगाव,तरंगेवाडी, बुरंगेवाडी,भोपसेवाडी. मंगळवेढा-गणेश वाडी,  दक्षिण सोलापूर -टाकळी,राजुर. माळशिरस-येळवी. मोहोळ-बोपले. बाशी -जहानपुर .त्याअर्थी , मी मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी सोलापूर असा आदेश देतो की , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियम 4 अ मधील तरतूदीनुसार उक्त नमुद तक्त्यातील ग्रामपंचायतीचे सन 2020-2025 या कालावधीचे दिनांक 27/01/2021 व दिनांक 22/02/2021 रोजीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात येत असून सन 2020-2025 या कालावधीकरिता सरपंच फेरआरक्षण सोडत प्रक्रिया दि .29 / 06 / 2021 रोजी सकाळी 11 : 00 वाजता तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तहसिलदार यांनी घ्यावी . सदर फेर आरक्षण सोडत काढताना महिला आरक्षण टक्केवारी नियमान्वये कायम राहील याची दक्षता घ्यावी . सदर फेरसोडतीस आपले स्तरावरून व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी . सदर निवड प्रकिया पार पाडताना खालील अटी शतीचे काटेकोर पालन करावे . 1. सदर सभा मोठया सभागृहात घ्यावी जेणेकरून Social Distancing चे पालन करता येईल . 2. सभागृहात प्रत्येक नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी . दोन नागरिकांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे . 3. सर्व नागरिकांनी मास्क / फेस शिल्ड वापरणे बंधनकारक आहे . नागरिक प्रवेश करतेवेळी थर्मलगन ने त्यांचे शरीराचे तापमान तपासण्यात यावे . 4. ज्या ठिकाणी सोडत आयोजित करण्यात येणार आहे त्या ठिकाणचा परिसर व सभागृह सॅनिटायझेशन करण्यात यावा तसेच नागरिकांनी सॅनिटायझच्या वापर करणे आवश्यक आहे . 5. अध्यासी अधिकारी यांचे सोबत त्यांना सहाय्यक म्हणून दोन अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच आवश्यक असल्यास सभेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे . 6. तहसिलदार यांनी सभागृहाबाहेर गर्दी होऊ नये याकरिता पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा .





Post a Comment

0 Comments