मगळवेढा - पोलिसाच्या भितीने भयभीत होऊन पळून जात असताना चक्कर आल्याने तरूण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्हायातील मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथे घडली आहे .
शुक्रवारी सकाळी पोलीस अधिकारी व कर्मचारी गावातील हेगडे यांच्या दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी येताच त्यांना पाहून नागेश नाथा हेगडे ( वय 22 ) हा युवक पळून जात असताना पाठीमागे पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून काही अंतरावर तो चक्कर येऊन कोलमडून खाली पडला . त्यात तो बेशुद्ध झाला . त्याला गावातील डॉक्टराकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचार करणेसाठी मंगळवेढा रुग्णालयाकडे नेण्यास सांगितले . त्यानुसार महिला हॉस्पिटल येथे
उपचारासाठी दाखल केल तथाल ९ T डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले . त्यानंतर मृतदेह मंगळवेढा पोलिस ठाण्यासमोर आणण्यात आला.आणि संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी ठाण मांडले . जवळ पास 3 तास मृत्यूदेह गाडीत ठेवला होता.याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन कुटुंबियांशी चर्चा करून चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले . यावेळी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे , सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलिस अधिकारी उपस्थित होते . याची फिर्याद वडिल नाथा हेगडे यांनी दिली . त्यानंतर तो मृत्यूदेह कुटुंबानी ताब्यात चितली . याची सखोल चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.सदर मयताची नोंद सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात म्हणून नोंद केली आहे .


0 Comments