google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील मांजरी येथे हायवे कडेच्या धाब्यांमध्ये अवैद्य दारू विक्री जोमात

Breaking News

सांगोला तालुक्यातील मांजरी येथे हायवे कडेच्या धाब्यांमध्ये अवैद्य दारू विक्री जोमात

 सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तालुका प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवत आहे . प्रशासनाने सुमारे दोन महिन्यापासून सांगोला तालुका पूर्णपणे बंद केला असतानाही तालुक्यामध्ये अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे . मात्र उत्पादन शुल्क विभाग याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे .


सांगोला - पंढरपूर हायवे वर असणार्या मांजरी येथिल धाब्यांमध्ये विनापरवाना अवैद्य दारू विक्रीला उधाण आले आहे . तालुक्यात लॉकडाऊन असल्याकारणाने वाईन शॉप व बिअर बार पूर्णपणे बंद असतानाही मुबलक प्रमाणावर या धाब्यांमध्ये दारू विकली जात आहे . प्रशासन प्रत्येक वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरातून बाहेर पडू नका असे सांगत असले तरीही नागरिक दारूच्या हव्यासापोटी घरातून बाहेर पडत आहेत . उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचे या अवैध दारूविक्री कडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित धाबा मालकाने दारूच्या किमतीच्या दुप्पट पैसे घेऊन विनापरवाना अवैध दारू विक्री जोमात सुरू ठेवली आहे . या अवैध दारू विक्रीमुळे ग्रामीण भागातील तरुण वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे . यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन सदरची अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांमधून होत आहे

Post a Comment

0 Comments