Breaking News

न्यूज माझा महाराष्ट्र चैनल चे सांगोला तालुका प्रतिनिधी सोमनाथ शहाजी नाईक नवरे विषय मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणाबाबत मा.तहसीलदार सांगोला यांना निवेदन..

 राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत) राष्ट्रीय महासचिव रमेश गंणगे (मामा) यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर जिल्हा व सांगोला तालुक्यामधून माननीय तहसीलदार साहेबांना व तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत व मानसिकता न्यूज चैनल चे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संपादक व न्यूज माझा महाराष्ट्र चैनल चे सांगोला तालुका प्रतिनिधी सोमनाथ शहाजी नाईक नवरे विषय मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षणाबाबत दिनांक 19 /2 /2021 रोजी चे परिपत्र काढून मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे वास्तविक यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही असे असताना यापूर्वी 20 एप्रिल 2021 ला महाराष्ट्र शासनाने निर्णय जारी करून मागासवर्गीयांच्या कोट्यातील 30 टक्के पदोन्नती ची रिक्त पदे कायम ठेवून वरित खुल्या प्रवर्गातील सर्व पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत निर्णय झाला होता परंतु राज्य सरकारने आदेश जारी करून सर्व पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेतला


हा निर्णय तमाम मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी वर्गावर अन्याय करत असून संविधानातील कलम 16 (4) नुसार दिलेल्या हक्काला जर धक्का देणार असाल तर महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार राज्यातील सर्व मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या शिवाय राहणार नाही याची दाज न घेतल्यास राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारतचे तालुका महिला अध्यक्ष व मानसिकता न्यूज चॅनलचे महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रतिनिधी सौ सुवर्णा सुनील कांबळे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा युवा सचिव सचिन गणपत माने व महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सोमनाथ शहाजी नाईक नवरे यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत उपस्थित कार्यकर्ते आप्पासो रामचंद्र वाघमारे तालुका अध्यक्ष   व निहाल बाळू मुलाणी

Post a Comment

0 Comments