सांगोला ( प्रतिनिधी ) : कोविड रुग्णांना बेड मिळेनात , बेड आहे तर हॉस्पिटलमध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीत . अशी परिस्थिती निर्माण झाली असताना , कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची प्रसूति कुठे व कोणते डॉक्टर करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना धन्वंतरी मेडिकोज सांगोला संचलित डॉ.साळे हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधित महिलेची नैसर्गिक रित्या यशस्वी प्रसूती केली आहे .
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ डॉ.विनायक डमकले , बालरोग तज्ञ डॉ राजेंद्र जानकर , फिजिशियन डॉ प्रसाद साळे , डॉ महेश राऊत , डॉ , मोहित घाडगे , विद्या चंदनशिवे सिस्टर , ब्रदर प्रशांत धनवे यांनी प्रयत्न केले . सध्य स्थितीला बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत सांगोला तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असताना . गरोदर महिलेची प्रसूती तारीख जवळ आली असता टेस्ट केली असता सदरची महिला कोरोना पॉझिटिव्ह आली . यावर नातेवाईकांचा विश्वासच बसेना नंतर त्यांनी पुन्हा टेस्ट केली असता तीही टेस्ट पॉझिटिव्ह आली . आता मात्र नातेवाईकांसमोर मोठा प्रश्न पडला . अश्या वेळी डिलिव्हरी कुठे करायचे ? कशी करायची ? कोण करणार ? असे मोठे प्रश्न पडले . यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी डॉ.साळे हॉस्पीटलमधील डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली असता हॉस्पिटलमधील वैद्यकीय स्टाफने तयारी दाखवली . त्यानुसार कोरोना बाधित गर्भवती महिलेस रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करून घेण्यास सांगितले.कोरोना विषाणू पासून मुक्त होण्याबरोबर बाळाची काळजी घेण्यासाठी डॉ.साळे हॉस्पीटलमधील यंत्रणा कामाला लागली.मंगळवार दि . २१ मे रोजी सदर महिलेची यशस्वीपणे प्रसूती पार पडली . लाखो दरात सध्या डिलेव्हरी खाजगी रुग्णालयात चालू असताना डॉ.साळे हॉस्पिटलमध्ये अल्पदरात प्रसुती करण्यात आली .


0 Comments