सांगोला तालुक्यातील मानवता एक्सप्रेस चे संपादक दादाश्री मागाडे यांचे निधन
सांगोला तालुक्यातील जवळा गावचे सुपुत्र व मानवता एक्सप्रेसचे संपादक श्री दादाश्री मागाडे यांचे मंगळवारी दिनांक 18 मे रोजी अल्पशा आजाराने सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचे वय 40 वर्षे होते ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यांनी अतिशय कमी कालावधीत सांगोला तालुक्यांमध्ये पत्रकार क्षेत्रात नाव कमविले होते त्यांचा तालुक्यात अतिशय दांडगा जनसंपर्क होता त्यांच्या निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी ,एक मुलगा ,तीन मुली ,तीन भाऊ असा मोठा परिवार आहे


0 Comments