अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल , डिझेलची विक्री सुरु ठेवा ; तहसीलदार अभिजीत पाटील यांचे पेट्रोल पंप चालकांना आदेश !
अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल - डिझेल विक्री सुरू ठेवावी . असे आदेश पेट्रोल पंप धारकांसाठी तहसीलदार अभिजित पाटील यांनी काढले आहेत .तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार इतर नागरिकांना पेट्रेल , डिझेल विक्री करण्यास मनाई करण्याचे आदेश तहसीलदार अभिजित पाटील यांनी केले आहे . सांगोला तालुक्यातील कोराना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता . कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सांगोला तालुक्यांमध्ये २१ मे ते १ जून पर्यंत तालुक्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यातक् आले आहेत . कोरोना विषाणूवर तात्काळ नियंत्रण मिळवणे, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे . त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसारचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून इतर व्यक्तींना त्याच्या संपर्कात आल्याने होत आहे .फक्त सध्या सांगोला शहरांमध्ये व तालुक्यात पूर्ण लॉक डाऊन असुनसुद्धा पेट्रोल , डिझेल पंपावर दुचाकी , चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे . तरी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता पेट्रेल,डिझेल पंपधारकांनी पेटेल , डिझेलची विक्री फक्त अत्यावश्यक सेवेसाठी, खाजगी व शासकीय वाहने , वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने , व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने , प्रसारमाध्यमे , वृत्तपत्र कर्मचारी मालवाहतूक करणारी वाहने इत्यादीसाठी सुरू ठेवावी. विनाकारण फिरणा-या नागरिकांना पेट्रेल,डिझेल विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे .


0 Comments