तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना बेड्या
मुंबई / प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी फिरायला बंदी असल्यामुळे नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. या गोष्टीचाच फायदा घेऊन वांद्रे येथील बँडस्टँड भागात 3 मित्रांनी 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली.गोवंडीत राहणारी 19 वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री 3 मित्रांसह दुचाकीवरून बँडस्टँड येथे आली. येथीलच खडकाआड मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास बदनामीची भीती घातली. काहीच दिवसांनी तरुणीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी 18 ते 21 वयोगटातील आहे. बॉलीवूडमधील 1 बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे


0 Comments