Breaking News

अश्लील शुटिंग काढून एक कोटीची मागणी ; दोघांवर गुन्हा

 अश्लील शुटिंग काढून एक कोटीची मागणी ; दोघांवर गुन्हा


। अहमदनगर । दि.16 मे । शरीर संबंधाचे अमिष दाखवून महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून एका व्यवसायिकास बांधून चाकूचा धाक दाखवून, मारहाण करत एक कोटी रुपयाची मागणी केली. एक कोटी रुपये न दिल्यास हा व्हिडीओ पोलीसांना दाखवून बलत्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देवून एका व्यवसायिकास फसविल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणात नगर तालुक्यातील एक महिला तसेच नगर शहरातील  कायनेटिक चौक परिसरातील एकाला अटक केली, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शरीर संबंधाचे अमीष दाखवून शरीरसंबंध ठेवण्यास परावृत्त करून त्याचा अश्लील व्हिडीओ तयार करून त्या आधारे पैशाची मोठी मागणी करून पैसे उकळणे या सदर्भांतील नगर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकारांनी माहिती दिली

ते पुढे म्हणाले की, नगर तालुक्यातील जखणगाव परिसरातील एका तीस वर्षीय महिलेने तिच्या साथीदारासह तालुक्यातील एका  मोठ्या व्यावसायिकास शरीर संबंधाचे अमीष दाखवून महिलेसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

त्यावेळी मोबाईल वरुन व्हिडोओ शुटिंग केली. त्या महिलेचा साथीदाराने व्यवसायिकास चाकुचा धाक दाखवून, बांधून मारहाण केली. व त्यांच्या कडे एक कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली. पैसे  दिले नाही तर हा व्हिडीओ पोलीसांना दाखवून बलत्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. 

त्या दोघांनी व्यावसायिकांच्या गळ्यात असलेले पाच तोळे वजनाची सोन्याची चेन व हातातील साडेसहा तोळे वजनाच्या चार सोन्यांच्या अंगठ्या व 84 हजार तिनशे रुपये रोख असा ऐवज मारहाण करून बळजबरीने काढून घेतला. ही घटना दि. 26 एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर पोलीसांकडे धाव घेतली. 

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी जखणगाव येथील एका महिलेला ताब्यात घेतले असता तिने एक साथीदार बरोबर असून गुन्ह्याची कबूली दिली आहे. व्यावसायिकाची हिसकावून घेतलेली चेन भिंगार अर्बन बँकेत भावाच्या नावाने गहाण ठेवल्याचे तिने पोलीसांना सांगितले. 

पोलीसांनी तिच्या घरातून एक अंगठी, 69 हजार 300 रुपये रोख तसेच बँकेत ठेलेली चेन ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी कायनेटीक चौक येथून महिलेचा एका साथीदाराला ताब्यात घेवून त्याकडील गुन्ह्यातील 15 हजार रुपये जप्त केले असल्याची माहिती देण्यात आली आहे

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पथकातील उपनिरीक्षक आर.एन. राऊत

हेडकोन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेष सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमीला गायकवाड, पो. कॉ. धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहीनी कर्डक, राजश्री चोपडे यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments