सांगोल्यात भाजपाच्या वतीने मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्ती निमित्त सेवाकार्य दिन सॅनिटायझर मास्क पौष्टिक आहार अन्नधान्याचे वाटप करून करण्यात आला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सांगोला भाजपच्या वतीने सेवाकार्य दिन साजरा करत पोलीस स्टेशन, नगरपालिका, डॉक्टर, परिचारिका यांना सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. तसेच मेडशिंगी कोविड सेंटरला पौष्टिक आहार वाटप, ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वस्तूंचे किट वाटप करण्यात आले
असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजपातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य केले जात आहे. सांगोल्यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन, नगरपालिका, डॉक्टर, परिचारिका यांना सॅनिटायझर,मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच येथील मेडशिंगी कोविड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहार देण्यात आला.जुनोनी भागातील गरजू नागरिकांना भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर यांच्यावतीने भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते गरजू नागरिकांना अन्नधान्य वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शहराध्यक्ष आनंद फाटे, डॉ.विजय बाबर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, प्रसाद फुले, बिरा मेटकरी, दीपक केदार, बाळू गाडे, राजू शिंदे ,दीपक केदार, रोहित सावंत, विनोद उबाळे, बाळासो चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सांगोला तालुक्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.





0 Comments