google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर शहर व जिल्ह्यात तारखेपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाउन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद

Breaking News

सोलापूर शहर व जिल्ह्यात तारखेपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाउन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद

 तारखेपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाउन; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद


 राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असतानाच सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. तथापि रुग्णांची संख्या वाढतच आहे.आज गुरुवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवीन निर्बंध जाहीर केले

 या पत्रकार परिषदेस सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या आठ तारखेला रात्री आठ वाजल्यापासून पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व सेवा बंद राहणार आहेत.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे.(स्रोत : लोकमत)

Post a Comment

0 Comments