google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोक राजाला विनम्र अभिवादन

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोक राजाला विनम्र अभिवादन

 विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोक राजाला विनम्र अभिवादन


              विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सुरुवातीला महाविद्यालयाचे ओ एस शामराव ठोंबरे गाडे सर दशरथ रणदिवे नियोजित समितीचे चेअरमन दीपक रिटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले


            महाविद्यालयामध्ये आदर्शवादी व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट करताना प्रा दीपक रिटे म्हणाले की छत्रपती शाहू महाराज हे एक समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते शाहू महाराज हे लोकशाही आणि समाज सुधारणा मांडणारे होते शाहू महाराज ही एक अशी व्यक्ती होती राजा असूनही दलित शोषित वर्गांचे दुःख समजून घेत असे दलित वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली त्यांच्याच कारकिर्दीत बाल विवाह वर बंदी घालण्यात आली ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले अशा या सामाजिक बांधिलकी ठेवून व शोषित पीडित वंचित यांच्या विषयी तळमळ असणाऱ्या या व्यक्तींचा आदर्शवाद विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अशा आदर्शवादी कर्तुत्ववान व्यक्तींच्या विचाराने ध्येयाने प्रेरित होऊन समाज सेवेचे वृत्त धारण केलं पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिपक रिटे यांनी केले तर आभार गाडे सर यांनी मानले कार्यक्रमाला उपस्थित शामराव ठोंबरे दशरथ रणदिवे भगवान पवार सौ विमल ताई माने बापू जाधव भजनावळे काका इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला

Post a Comment

0 Comments