सोलापूर : कोरोनाला घाबरून विजापूर रोडवरील मंत्री चांडक रेसिडेन्सी येथील राहत्या घरी विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला . रेखाराणी अमर मुंडे ( ३७ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे .
रेखाराणी यांचे पती अमर मुंडे यांना कोरोना झाला होता . खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून पंधरा दिवसांनंतर ते घरी आले होते . त्यानंतर त्यांच्या मावस भावाला कोरोना झाला होता . त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . भावांना डबा देण्यासाठी अमर मुंडे दवाखान्यात जात होते . यापूर्वीच अमर मुंडे यांना कोरोना झाला होता , त्यामुळे पुन्हा तुम्ही डबा द्यायला जाऊ नका , असंरेखाराणी अमर मुंडे यांना वारंवार सांगत होती . सोमवारी रात्री अमर मुंडे हे घरी आले . तेव्हा दोघा पती - पत्नींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला . अमर मुंडे यांनी तू भिऊ नको . उद्या तुला गावाकडे पाठवतो असे म्हणाले आणि घराच्या बाहेर येऊन बसले . तेव्हा रेखाराणी यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार लक्षात येताच पती अमर मुंडे व शेजारच्या लोकांनी त्यांना खाली उतरून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले . मात्र , तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले . याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे .
0 Comments