Breaking News

धक्कादायक बातमी.. मंगळवेढ्यातील तरूणीस पळवून नेवून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी तीघांविरूध्द गुन्हा दाखल

 मंगळवेढ्यातील तरूणीस पळवून नेवून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी तीघांविरूध्द गुन्हा दाखल


जेवणातून गुंगी येणारी पांढरी पावडर खाऊ घालून एका २४ वर्षीय तरूणीवर ५२ दिवस (अन्वी जि.औरंगाबाद) येथे नेवून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी सिध्दार्थ बिराप्पा पांढरे, चंद्रकांत बिराप्पा पांढरे , मंगल यशवंत पांढरे (सर्व रा.कात्राळ) या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी तथा २४ वर्षीय पिडीत तरूणी दि.२७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ९ .०० वा. बाथरूमकरीता घराच्या बाहेर आली असता वरील आरोपीने मोटर सायकल क्रमांक एम एच १३ डी.पी .१५१० यावर फिर्यादीस बळजबरीने बसवून घेवून गेले

आरोपीने पिडीतेस प्रथमतः पुणे येथील एका अनोळखी शेतात नेवून बसवले.व तेथून आरोपी सिध्दार्थ पांढरे याने पिडीतेस अन्वी जि.औरंगाबाद येथे नेवून ५२ दिवस जेवणातून गुंगी येणारी पांढरी पावडर खाऊ घालून धमकी देवून पिडीतेवर वारंवार अत्याचार केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments