सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला शहरामध्ये सध्या वशिलेबाजीसाठी एकमेकांचे फोन खणाणत असून , ही वशिलेबाजी इतर कारणांसाठी नसून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सुरू असल्याचे समोर येत आहे . ज्यांचा वशिला चालतोय त्यांनाच बेड उपलब्ध होतायत , पण ज्यांचा वशिलाच नाही , असे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत .
या वशिलेबाजीमध्ये जिल्हाधिकारी , तहसीलदार , मुख्याधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे .1 मात्र , गत काही दिवसांपासून शहरातील काही रुग्णालयांमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते . वास्तविक सर्वसामान्य रुग्णांना बेड कोणत्या रुग्णालयांमध्ये शिल्लक आहेत , हे समजतच नाही . कारण प्रशासनाने दिलेली वेबसाइट ही अपडेट नसल्याने माहिती मिळणे मुश्कील झाले आहे . त्यामुळे अनेक रुग्ण बाधित रुग्णाला सोबत घेऊन शहरातील रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत . मात्र , तरीही त्यांना बेड शिल्लक नसल्याचेच सांगण्यात येते ,कोरोनाबाधित अहवाल आल्यानंतर अनेकजण सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर बेड त्यांना मिळतो , पण रात्री गेल्यानंतर शिल्लक नसल्याचे सांगितले जाते . खरं रात्रीच्या सुमारास घरात बाधिताची प्रकृती अचानक बिघडली , रात्री रुग्णाला घेऊन जाणार कुठे , असा प्रश्न तर नातेवाइकांसमोर पडतोय . त्यामुळे नेमके बेड शिल्लक कुठे आहेत . नसेल तर काय करायला हवे , याची माहती प्रशासनाने रोजच्या रोज दिली तर नागरिकांची दिशाभूल होणार नाही .अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध होणे शक्य नाही . मात्र , जे घरी राहून उपचार घेत आहेत . अशा बाधितांना घरी औषधे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करायला हवे . बाधितांचे नातेवाईक त्यांच्यासोबत राहत नाहीत . त्यामुळे प्रशासनाकडून कोणी घरी गेल्यास रुग्णांना दिलासा तर मिळेलच , शिवाय उपचारही होतील , यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असून तरी होताना सध्या दिसत नसल्यामुळे प्रशासनाविरून तीव्र संताप आहे .
0 Comments